खेळ थांबला पाहिजे..
जाळणाऱ्या आणि जळणाऱ्या कातडीचा
हा खेळ,
थांबला पाहिजे
वस्त्या जळत राहायच्या
आम्ही पावसाची वाट बघायचो
डोक्यात दगड पडायची
आम्ही वेदना पचवायचो
काळ्या पांढऱ्या हिरव्या लाल
सगळ्या uniform ला
सलाम ठोकायचो...
We the people आणि my Lord
मधला हा खेळ,
थांबला पाहिजे...
लोकांसाठी लोकांनी बनवलेल्या व्यवस्थेत
आजकाल
मत मोजतात,
मत विचारत नाहीत...
मतमोजणीचा
हा असला खेळ
थांबला पाहिजे...
अपूर्ण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा